• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरात पत्रकारभवनाची देखणी इमारत बांधूनच देणार : आमदार दत्तात्रय भरणे

tdadmin by tdadmin
January 7, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
इंदापूरात पत्रकारभवनाची देखणी इमारत बांधूनच देणार : आमदार दत्तात्रय भरणे

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुका शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी दुःखाच्या काळामध्ये,कोरोनाच्या संकटात, इंदापूर तालुक्यामध्ये १४ हजार कुटुंबांना अन्नधान्य पुरवून आधार देण्याची भूमिका घेतली.इतकी मदत राज्यामध्ये कोणत्याही पत्रकार संघाने जनतेला केली नाही.ती मदत इंदापुरात झाली.गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा पत्रकार संघाने मानली आहे. म्हणूनच जे बोलतो ते करतो. त्यामुळे शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनची इमारत देखणी बांधूनच देणार असा शब्द आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान सोहळा तसेच महिला सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी भगिनी यांचा पैठणी देऊन सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा(ता.६ जानेवारी)शनिवारी पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शरद पवार गटाचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, माजी सभापती मयूरसिंह पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह सामाजिक राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व सचिव सागर शिंदे यांनी उपस्थितांचा सन्मान केला.

आमदार भरणे म्हणाले की,पत्रकार संघाच्या माध्यमातून गरीब भगिनींचा पैठणी सन्मान करण्याची परंपरा जपली आहे. जे अहोरात्र जनतेसाठी कष्ट करतात त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे. याचा मला आनंद वाटतो. पुरस्कार देऊन तालुक्यातील विकासाच्या भागीदारांना गौरवले, त्यामुळे त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे. आता दुप्पट वेगाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचे आहे.असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर भूषण म्हणून गौरवलेले भरत शहा, आदर्श सरपंच म्हणून चित्रलेखा ढोले, सहकाररत्न वसंतराव मोहोळकर, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, उद्योजक संजय दोशी, अमोल करे, आदर्श शिक्षक ज्ञानदेव चव्हाण, आदर्श वैद्यकीय वैद्यकीय सेवा डॉक्टर सुरेखा पोळ यांच्यासह सर्व पुरस्कार हे खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत.

राजकारण समाजकारण अर्थकारण खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून राज्याला देशाला कळते आहे. पत्रकारांना विम्याचे संरक्षण देणे पत्रकार भवन उभारणे हे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे आम्हाला सहकार्य करता येईल. तिथे आम्ही मनापासून सहकार्य करू, पत्रकारितेला सन्मान देणे आणि संरक्षण देणेही भूमिका सर्वांनी घेणे गरजेचे आहे. कोविड काळात जनतेला मदत वृक्षारोपणाचा उपक्रम, पत्रकार संघाने यशस्वी राबवला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्याशी ऋणानुबंध इंदापूर तालुक्याचे जुनेच असल्यामुळे पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. पत्रकार संघाच्या जागेच्या प्रश्नासाठी जी मदत लागेल ती दिली जाईल.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजनासाठी आणले जाईल असा शब्दही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

यावेळी पत्रकार सुरेश मिसाळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे,तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार सचिव सागर शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन निलेश धापते केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप सुतार,खजिनदार भीमराव आरडे, गोकुळ टांकसाळे, बाळासाहेब कवळे, उदयसिंह जाधव देशमुख, सुरेश मिसाळ,प्रेमकुमार धर्माधिकारी, अमोल रजपुत, नितिन चितळकर, दिपक शिंदे, राजेंद्र कवडे देशमुख, संतोष दहिदुले,बाळासाहेब धवडे, तात्याराव पवार,इम्तिहाज मुलाणी,लक्ष्मण भिसे, उमाकांत तोरणे,भारत शेंडगे, श्रीयश नलवडे, नानासाहेब लोंढे, निलेश भोंग, गणेश कांबळे, आकाश भोसले, बाळासाहेब जामदार, आबा राऊत, राजेंद्र भोसले, मिलींद मखरे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Next Post
शिरूरच्या संकल्प फोर्जिंग कंपनीचं प्रकरण पेटलं! रोहित पवारांनी टीका करताच सरकार लागले कामाला! कंपनीला ब्लॅकमेल करणारा कोण आहे सुशांत कुटे?

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला उसाचा शेतातच दिले पेट्रोल टाकून पेटवून! दौंड तालुक्यातील मलठण येथील घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group