नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
मुंबई वरचा म्हणजेच देशावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर ज्याला 26 11 चा दहशतवादी हल्ला म्हणतात, तो अद्यापही कोणाच्याही विस्मरणात गेलेला नाही. नुकत्याच एक महिन्यांपूर्वीच म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या भळभळत्या जखमा अजूनही ताज्याच आहेत आणि आता या जखमेवर फुंकर घालणारी एक बातमी आलीय, ती पाकिस्तानातून! अजून त्याला दुसरा मिळालेला नाही, मात्र जे घडले ते भारतीयांसाठी विस्मयकारक असेच आहे. बातमी अशी आहे, मुंबईतील 26 /11 च्या हल्ल्यात मुख्य सूत्रधारांपैकी एक होता, तो पाकिस्तान लष्कराच्या दहशतवादी साजिद मीर! याच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे.
साजिद मीर हा लाहोर सेंट्रल जेलमध्ये होता. काही महिन्यांपूर्वी त्याला डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते. त्याच्यावरती जरी लष्कराची करडी नजर असली, तरी याच डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. त्याच्यावर विष प्रयोग झाल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर बनली.
यानंतर तातडीने पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने त्याला विमानाने बहावलपूरच्या केंद्रीय रुग्णालयात हलवले आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत, मात्र याच दरम्यान डेरा गाझी खान सेंट्रल जेलमधील स्वयंपाकी गायब असल्याची माहिती पुढे आली आहे.











