पुणे : महान्यूज लाईव्ह
मंगोलियात सुरू असलेल्या वर्ल्ड मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्यातील ४० वर्षीय डॉ. शर्वरी इनामदार यांनी कमाल केली आहे. जागतिक स्पर्धेत त्यांनी 57 किलोग्रॅम वजनात वर्ल्ड मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
डॉ. शर्वरी इनामदार या आयुर्वेदिक पदवीधारक डॉक्टर आहेत. त्या पुण्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी देखील खूप स्पर्धा केलेल्या आहेत मंगोलियात झालेल्या या स्पर्धेत शर्वरी यांनी रिचार्ज स्पर्धकाला हरवत कीर्कपेट्रीक रिबेका हिचा पराभव केला. ३५० किलोग्रॅम १२७.५ किलोग्रॅम स्वाट 75 किलोग्रॅम बेंच प्रेस वजन उचलत सुवर्णपद पटकावले, तर दुसऱ्या प्रकारात 147.5 किलोग्राम डेड लिफ्टिंग मध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले.
ओके डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या बेस्ट लिफ्टर्स ऑफ स्ट्रॉंग वुमन या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी केलेल्या कामगिरीने देशातील वेटलिफ्टिंग करणाऱ्या क्रीडापटूंना देखील मोठी प्रेरणा मिळाली आहे











