सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
भादलवाडी येथील बिल्ट कंपनीच्या अनागोंदी कारभारावरून अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदन देऊन मागण्याची पूर्तता पंधरा दिवसात करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.
यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी बील्ट पेपर कंपनीचे व्यवस्थापक, माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक व भिगवण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह 19 ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालयात बैठक बोलावली आहे.
बिल्ट पेपर कंपनीतील सन 2011 पासून प्रतिक्षा यादीत ठेवलेल्या माथाडी कामगारांना नियमानुसार न्याय मिळत नाही. स्थानिक तसेच माथाडी व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि कंपनीच्या नोकरभरती मधील अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवण्यासाठी मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांनी निवेदन दिले होते आणि 15 दिवसात मागण्या मान्य करुन तसा लेखी खुलासा करावा अशी मागणी केली होती.
याबाबत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . त्यानंतरही कंपनीने आणि संबधित प्रशासनाने सदर निवेदनाची काही दखल घेतलेली नव्हती, म्हणून पुन्हा स्मरणपत्र देऊन 28 ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन केलें जाईल असे निवेदन दिले. दरम्यान पूर्वी दिलेल्या निवेदनावर कंपनीने असमाधानकारक खुलासा केला आहे, परंतू यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचां प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी लक्ष घालून संबधितांची बैठक बोलावली आहे.
यामध्ये काय मार्ग निघतोय याकडे सर्वांचे लक्ष आहे. सदर मराठा महासंघाचे निवेदनाची दखल घेतली नाहि जर आंदोलनं करण्याची वेळ आली तर त्यासाठी परिसरातील भिगवणसह मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ, कुंभारगाव, डाळज 1,2,3, शेतफळगढे पिंपळे, स्वामी चिंचोली, खानवटे ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच लोकशासन आंदोलन भिगवण परिसरातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, सोसायट्या, तरुण मंडळांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तसेच आंदोलनात सहभागी होण्याचे लेखी जाहीर केले आहे. याबाबत आता तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
याबाबत बोलतांना मराठा महासंघाचे पूणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप म्हणाले की, मराठा महासंघ ही एक सामजिक संघटना माथाडी कामगारांचे नेते व स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे. त्यामूळे संघटनेकडे आलेल्या बिल्ट कंपनीमधील विविध प्रश्नांसाठी संघटनेने निवेदन दिले आहे. यामध्ये आमचा कोणत्याही कंपनीविरोधात वैयक्तिक रोष नाही. त्यामूळे कंपनी प्रशासनाने तसा कोणताही अर्थ न काढता निवेदनात दिलेले प्रश्नावर तात्काळ कायदेशीदृष्ट्या मार्ग काढावा अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला सनदशीर मार्गानें जनआंदोलन उभारावे लागेल.











