दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
भुईंजचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीस जणांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित मनाई केली आहे. ही मनाई दहा दिवसांसाठी असल्याची माहिती गरजे यांनी दिली.
नवरात्रौत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरवात झाली असून प्रत्येक गावात देवीच्या मंदिरांमध्ये भाविक महिला, पुरुष, युवांची देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या नवरात्र उत्सव कालावधीत भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी कठोर भूमिका घेतली.
ज्या लोकांपासून गावोगावची शांतता भंग होऊ शकते, अशा २० जणांचे 24 ऑक्टोबर पर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित मनाईचे प्रस्ताव तयार करुन ते अंतीम मान्यतेसाठी पाठवले होते. त्यास जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांनी तातडीने मंजुरी दिली. पुढील कारवाईसाठी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्यामार्फत वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना पाठवून त्यांच्याकडून अंतिम मंजुरी घेण्यात आली.
त्यानुसार आता या प्रस्तावानुसार २० गुन्हेगारांना भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधित मनाई करण्यात आली आहे अशा नोटीसा पाठविण्याचे पाठविण्याचे आदेश प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले होते. त्यांनीही तातडीने २० जणांना या नोटीसा बजावल्या.











