बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत परवा प्रलंबित राहिलेल्या नमुन्यांपैकी 14 जण कोरोनाबाधित आढळले असून यामध्ये बारामती शहरातील 50 वर्षीय महिला, सुभाष चौक येथील 38 वर्षे पुरुष, बारामती शहरातील 25 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ येथील 33 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 35 वर्षीय पुरूष, संघवी नगर येथील 24 वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 39 वर्षीय पुरुष, जळोची येथील 16 वर्षीय मुलगी, डोर्लेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 48 वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामती मध्ये काल झालेल्या शासकीय तपासणी मध्ये वडगाव निंबाळकर येथील 50 वर्षीय महिला, निरावागज येथील 60 वर्षीय महिला, कटफळ येथील 26 वर्षीय पुरुष, सस्तेवाडी येथील 42 वर्षीय महिला, अंजनगाव येथील 54 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
वडगाव निंबाळकर येथील साठ वर्षे पुरुष, 18 वर्षीय मुलगी, वीस वर्षीय मुलगी, कांबळेश्वर येथील 77 वर्षीय महिला, निरावागज येथील 52 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, पवारवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, सोरटेवाडी येथील 34 वर्षीय महिला, कोऱ्हाळे येथील 18 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 63 वर्षीय महिला, तरडोली येथील 72 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील 65 वर्षीय महिला, बारामती शहरातील 14 वर्षीय मुलगा, बुरुड गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
शासकीय एंटीजन तपासणीत सोनगाव येथील 26 वर्षीय महिला, निरावागज घाडगेवाडी येथील 65 वर्षे पुरुष, बारामती शहरातील 40 वर्षीय पुरुष, खंडोबा शनगर येथील 85 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 42 वर्षीय महिला, चौधर वस्ती येथील 24 वर्षीय युवक, भिगवण रोड येथील 46 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 25 वर्षीय युवक, वंजारवाडी येथील 33 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीत झालेला खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपळी येथील 28 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 62 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी खांडज येथील 32 वर्षीय पुरुष, शिवनगर माळेगाव येथील 65 वर्षीय महिला, पणदरे येथील जगताप गल्ली येथील तीस वर्षे पुरुष, सांगवी गावठाण येथील 48 वर्षे पुरुष, निरावागज येथील 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेतच झालेल्या तपासणीमध्ये ग्रीन पार्क एमआयडीसी येथील 41 वर्षीय महिला, जामदार रोड कसबा येथील 38 वर्षीय पुरुष, विजय नगर तारांगण येथील 73 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील ओम रेसिडेन्सी मधील 37 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, भिगवण रोड सुधा रेसिडेन्सी येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
ओझर्डे इस्टेट टीसी कॉलेज रोड 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगा, एमआयडीसी श्री समर्थ अपार्टमेंट येथील 31 वर्षे पुरुष, साठ वर्षे पुरुष, त्रिमूर्ती नगर जळोची येथील 48 वर्षे पुरुष, बालक मंदिरासमोर 52 वर्षीय पुरुष, पंचशील नगर कसबा येथील 38 वर्षीय पुरूष, तांबे नगर येथील 28 वर्षीय पुरुष, माउलीनगर भिगवण रोड येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
बारामतीत उपचार घेणाऱ्या सात जणांचा दिवसभरात मृत्यू
बारामतीत कालचा दिवस देखील दुःखद गेला. बारामतीत काल दिवसभरात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. यामध्ये बारामतीतील दोन कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. कर्जत, जामखेड, फलटण तालुक्यातील रुग्णांसह, सारीच्या संशयित रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. बारामतीतील रुग्ण संख्या आता या मृत्यूमुळे 54 एवढी झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील पाच जण कोरोना बाधित
इंदापूर तालुक्यात बारामती मध्ये तपासलेल्या व आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाच जण नवे कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये भवानीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, सणसर भोईटेवस्ती येथील 62 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 42 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला व अठरा वर्षीय मुलीचा समावेश आहे.











