महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोल्हापूरचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले आहे.
अस्वस्थ वाटू लागल्याने राजू शेट्टी यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.
राजू शेट्टी यांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी ( 8 सप्टेंबर) पॉझिटीव्ह आला होता. सुरुवातीला त्याच्यावर कोल्हापूरमध्ये घरीच उपचार करण्यात आले मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.











