महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी स्वत: याची माहिती दिली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांच्यात कोविड 19 ची लक्षण दिसून येत होती. मुंबई महापालिकेच्या कोविड 19 हॉस्पिटलची स्वतः त्या सातत्याने पाहणी करीत होत्या. आता त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
किशोरी पेडणेकर यांची अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सध्या त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वय 58 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांना बीएमसीच्या सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्याची शक्यताही सांगितली जात आहे.











