दौंडच्या ग्रामिण भागात नव्याने आणखी 41 जणांना कोरोनाची बाधा. केडगाव, यवत, पाटस, राहुत कोरोनाचे तांडव
.
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड आज सकाळपर्यंत 27 जण कोरोनाबाधित आढळले असतानाच आता पुन्हा नव्याने दुपारच्या अहवालात 41 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. संपूर्ण कुटुंबे कोरोना बाधित आढळून येऊ लागल्याने नागरिक काळजी घेत नाहीत हेच दिसून येऊ लागले आहे.
शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात काहीसा कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढला आहे. सोमवारी पाठविण्यात आलेल्या अवहवाल दौंडच्या ग्रामिण भागात तब्बल 41 जणांचा कोरोनाचा तपासणी अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. सकाळी शहरात 27 जणांचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला असताना दौंडच्या ग्रामिण भागाच्या अहवालात 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
सोमवारी ( दि.17 ) कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील 79 जणांची कोरोना तपासणी यवत येथील कोवीड सेंटर मध्ये करण्यात आली. त्याचा अहवाल आज बुधवारी (ता.19) प्राप्त झाला. 79 पैकी तब्बल 28 जणांचा अहवाल हा कोरोना पॅाझिटिव्ह आला अशी माहिती यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा. शशिकांत इरवाडकर यांनी दिली, तर स्वामी चिंचोली येथे तपासणी झालेल्या नमुन्यामध्ये 13 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली
आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये केडगाव येथे तब्बल 10 जणांना कोरोना झाला आहे. यवत येथे तीन, पाटस दोन, राहू तीन, चौफुला तीन, बोरीपार्धी दोन, भांडगाव दोन, नाथाचीवाडी एक, राहु येथे तीन, चौफुला येथे एक, खडकी येथे दोन, स्वामी चिंचोली येथे दोन, कुरकुंभ येथे सहा, बोरीबेल येथे एक वासुंदे येथे एक व राजेगाव येथे एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित रुग्ण हे पुणे येथील आहेत. दरम्यान, सोमवारी ( ता.17 ) दौंड शहरातील व ग्रामीण भागातातील तब्बल 239 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली यापैकी 194 जणांचा निगेटिव्ह आला आहे.










