वाटा रोजगाराच्या : समीर मुलाणी
बारामती : महान्यूज लाईव्ह
स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 5,846 कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया सुरू असून याकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 7 सप्टेंबर 2020 पर्यंत आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून होणारी ही भरती संपूर्ण देशासाठी असून यामध्ये पुरुष कॉस्टेबल पदाच्या 3 हजार 433 तर महिला कॉन्स्टेबल पदाच्या 1944 जागा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त अनुसूचित जाती जमातीचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुरुषांकरिता 226 जागा तर महिलांकरिता 243 जागा वाढीव आहेत.
या पदासाठी खुल्या गटातील उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष व कमाल वय 25 वर्ष असावे. परंतु राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सवलत असून माजी सैनिकांसाठी वयाच्या 45 वर्षापर्यंत सवलत आहे. भरती प्रक्रिया लेखी परीक्षा शारीरिक चाचणी वैद्यकीय चाचणी व मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठी बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्थात अकरावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना देखील यामध्ये पात्रता ठेवण्यात आली आहे.
यामध्ये पुरुष उमेदवाराला हलके वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. या करिता उमेदवारांना 100 रुपये शुल्क असून महिला उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती व माजी सैनिकांना शुल्क माफी आहे. मैदानी चाचणी मध्ये पुरुष उमेदवारांसाठी तीस वर्षापर्यंतच्या उमेदवारांना सहा मिनिटात 1600 मीटर धावणे, लांब उडी मध्ये 14 फूट तर उंच उडी मध्ये ते तीन फूट नऊ इंच अशी मर्यादा आहे. महिला उमेदवारांसाठीही मैदानी नियम असून अधिक माहितीसाठी www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.











