बारामती : महान्यूज लाईव्ह
आज आज सकाळी 82 नमुन्यांपैकी 7 नमुने प्रतीक्षेत होते, त्यापैकी तिघाजणांना कोरोना ची लागण झाली असून त्यातील दोघे जण बारामती तालुक्यातील असून एक जण इंदापूर तालुक्यातील सणसर येथील आहे.
प्रतीक्षेत असलेले सात अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामतीमधील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये गुणवडी रोड बारामती येथील एक पुरुष व माळेगाव येथील एक पुरुष यांचा समावेश आहे व एक रुग्ण इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पॉझिटिव्ह आलेला आहे व उर्वरित 79 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.बारामती तालुक्यातील 82 नमुने घेऊनही अनेक जण निगेटिव्ह आलेले आहेत ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब आहे मात्र इंदापूर तालुक्यात दररोज वेगवेगळ्या गावातील रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने तेथे मात्र चिंतेची बाब निर्माण झाली आहे










