दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील नऊजणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आऱोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
सोमवारी कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील ७९ जणांचा कोरोना विषाणुची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. ७९ पैकी ९ व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह, तर ७० जणांचा आहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील कानगाव येथे दोन, ताम्हाणवाडी येथे चार, हातवळण, खुटबाव, कुरकुंभ या गावामध्ये प्रत्येकी एक असे नऊ नव्याने रूग्ण सापडले आहेत.











सर्वानी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे ,आणि सोशिअल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे, डाॅक्टर, पोलीस, सफाई कामगार यांना सहकार्य करणे गरजेचे आहे …..