दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील गल्ली बोळात कोरोना विषाणू चा संसर्ग पसरला आहे, आज प्राप्त झालेल्या अहवालात ३ ते ७० वयोगटातील ११ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. काल (ता. २४ ) शहरातील कोरोना बाधीतांच्या संपर्कातील ५५ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये शहरातील विविध भागात ११ कोरोना बाधीत रूग्ण आढळले. उर्वरित ४४ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल शहरातील १४ जण कोरोना पाँझिटिव्ह होते.
दरम्यान शहरातील सर्व भागात कोरोना विषाणू प्रादुर्भाव पसरत आहे. आज शहरातील शिवराज नगर, फादर हायस्कूल व स्टेट बँक येथे प्रत्येकी दोन तर शालिमार चौक, कुंभार गल्ली, खाटीक गल्ली लिंगाळी रोड या भागात प्रत्येकी एक असे ९ पुरुष व २ महिलांसह एकूण ११ जण कोरोना बाधितांची यामध्ये ९ पुरुष व २ महिलांची नोंद झाली आहे.










