इंदापुर : महान्यूज लाईव्ह
इंदापुर मध्ये आज नव्याने पाच कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील चार रुग्णांचा जंक्शन येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील कोरोना ची वाढती साखळी पुन्हा एकदा तुटता तुटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातही वेगवेगळ्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.
आज आलेल्या अहवालानुसार 30 जणांच्या कोरोना नमुन्यांपैकी 25 जण निगेटिव्ह आले असून इंदापूर शहरातील ठाकूर गल्ली येथे आढळून आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर जंक्शन येथील काल सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.










