दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस मधील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या रूग्णालयातील दोन महिला व एका सहायकास कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य खात्याने त्यांच्या संपर्कातील कुटुंबांसह इतरांची चाचणी केली होती. त्यामधील ३५ जणंचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.
संबंधित डॉक्टरांच्या कुटुंबासह संपर्कातील व रूग्णालयातील कर्मचारी, रूग्णालयात आलेल्या रूग्णांचा शोध घेवून आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी केली, त्यातील ३५ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. यामध्ये पंचायत समितीच्या सभापतींसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पाटसकरांना व आसपासच्या भागातील नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आरोग्य विभागाने आज संबंधित कोरोनाबाधीत रूग्णालयातील कर्मचारी व कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह इतरांचा शोध घेवून आणखी १३ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले आहेत. आरोग्य विभागाने संबंधित रूग्णालयापासून पाचशे मीटर अंतराचा परिसर सील केला आहे, तसेच संपूर्ण गावठाण, पंचशील नगर, भागवत रायकर वस्ती, ठोंबरे वस्ती, कानगाव रोड, महाराष्ट्र बँक चौकातील भाग प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, वाड्या वस्त्यावरील नागरीकांनी कामाशिवाय गावात येवू नये, बाहेरील व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
दुसरीकडे वरवंड येथील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या कुटुंबातील व संपर्कातील ८ जाणांचे कोरोना टेस्ट करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.











पाटस च्या बातमी मध्ये दोन डॉक्टर या शब्द प्रयोगाऐवजी डॉक्टर दांपत्य असा उल्लेख करावा जेणेकरून पाटस च्या इतर उर्वरित डॉक्टरांबद्दल अफवा पसरवली जाणार नाही.सध्या पाटस मधील इतर प्रसिद्ध डॉक्टरांना अशा बातम्यांमुळे नाहक त्रास होणार नाहि याचीही बातमीदार व संपादक यापुढे काळजी घेतील अशी आशा करतो.
नक्कीच.. यापुढे काळजी घेऊ सर…!