दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, आज शहरात एक पुरूष एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंडच्या ग्रामीण भागातील केडगाव, बोरीपीर्धी, खुटबाव व पाटसमध्ये कोरोनाबाधीतच्या संपर्कातील अनेक जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असतानाच दौंड शहरात दोन नव्याने कोरोनाची लागण असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मागील आठवड्यात राज्य राखीव दलाचे ८० जवान मुंबई येथून आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केली असता तीन जवानांना कोरोनाची लागण झाली होती.
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाबाधीतांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाची टिम चांगलीच कसरत होत आहे.










