अॅड. विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह
आनंदवनातील डॉक्टर शीतल आमटे यांनी केलेल्या आत्महत्येची आठवण करून देणारी घटना कर्जत तालुक्यात काल रात्री घडली. विषारी इंजेक्शन टोचून घेऊन 28 वर्षाच्या डॉक्टरने आत्महत्या केली. त्यामुळे कर्जत हादरले.
डॉ. विश्वास अर्जुन कवळे (वय 28 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत) असे या डॉक्टरचे नाव असून शुक्रवारी रात्री राहत्या घरात डॉक्टरांनी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली.
डॉक्टर विश्वास यांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मिरजगाव येथील घरातच वैद्यकीय सेवा सुरू केली होती मात्र अचानक आत्महत्या केल्याने मिरजगाव सह कर्जत तालुक्यातील सर्वांनाच धक्का बसला
डॉ. विश्वास याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून वैयक्तिक आजारामुळे मी आत्महत्या करत आहे, आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत.











