बारामती : महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर, सांगलीतील पाठीमागील महापुरानंतर चिपळूण मधील झालेल्या महाप्रलयाची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडने फ्लड रिलिफ मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत वस्तू रुपात मदत केली जाणार असून याकरिता बारामती व भवानीनगर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मदत केंद्र सुरू केली आहेत.
कोकणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड पुढे सरसावले असून, कोणाच्याही आवाहनाची वाट न पाहता ते 20 ते 25 जुलै दरम्यान किराणा वस्तू, पाणी, ब्लांकेट्स अशा स्वरूपात मदत घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत स्वीकारली जाणार नसल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
याअंतर्गत बारामतीतील रिंग रोड येथील हॉटेल शिवेंद्र, अशोक नगर येथील आरजे सायकल स्टुडिओ, एमआयडीसीतील ऐश्वर्या बेकरी व छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर ही केंद्र सुरू राहणार असून, रिंग रोड येथील हॉटेल शिवेंद्र येथे मदत करण्यासाठी संपर्क क्रमांक 77 09 91 92 92, 96 57 25 7007 हा आहे.
ऐश्वर्या बेकरी येथे मदतीसाठी 88880 31800, 9359320551 या क्रमांकावर संपर्क साधावा. छत्रपती कारखाना भवानीनगर येथे मदत करावयाची असल्यास 9075974242, 9637779007, 9561611011 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











