रामटेकडी मध्ये मोफत आरोग्य तपासणी व मास सैनी टायझर वाटपाचा विविध कार्यक्रम
अनिल गवळी, महान्यूज लाईव्ह
वानवडी – भाजप सरकारच्या महागाईला आता जनता वैतागली आहे. इंधन, गॅस व जीवनावश्यक वस्तींच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत, सामान्य जनता त्रासली असून हे केंद्र सरकारचे पाप असल्याची टिका माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली.
येथे मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नगरसेवक सतीश लोंढे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर, कोरोना योद्धा पुरस्कार, नेत्र तपासणी शिबिर, सॅनिटायझर वाटप, आधारकार्ड, पॅन कार्ड वाटप व मनपा सफाई कर्मचारी यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवरकर बोलत होते .यावेळी माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक आनंद आलकुंटे, हडपसर विधानसभा अध्यक्ष सोहेब इनामदार, मामा तुपे, अमित घुले, आयोजक खंडू लोंढे, ललित लोंढे ,अरुण अल्हाट, वामन धाडवे ,शहाजी खंडागळे, रोहित बागडी, काँग्रेस पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या विविध कार्यक्रमाचे आयोजन खंडू लांडे यांनी केले होते.
शिवरकर म्हणाले, भाजप मोदी सरकारला जनता वैतागली असून पेट्रोल-डिझेल खाद्य तेलाच्या किमती भरमसाठ केल्या सर्वसामान्य जनता महागाईने त्रासली असून रोजच्या रोज इंधन दरवाढ करून मोदी सरकारने जनतेस महागाईच्या खाईत लोटले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात दोन-तीन रुपये पेट्रोल दरवाढ झाली तेव्हा स्मृती इराणी यांनी बांगड्या पाठवण्याची भाषा केली होती, आता पेट्रोल एकशे पाच रुपयांच्या पुढे गेले असून आता मोदी सरकारला काय पाठवायचे?











