इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या पाण्यासाठी उपोषण करण्याकरता आलेल्या सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर देशमुख यांना पत्रकारांच्या समोरच पोलिसांनी ताब्यात घेतले.
उजनीतून इंदापुर तालुक्यात पाणी देण्यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यासाठीचा शासनाचा आदेश जलसंपदा विभागाने रद्द केल्यानंतर, मी इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देणार अशी घोषणा करून प्रभाकर देशमुख यांनी 16 जून रोजी इंदापुरात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज ते सकाळी उपोषणासाठी आले.
प्रभाकर देशमुख आज येणार याची कल्पना पोलिसांना होती. त्यानुसार प्रभाकर देशमुख चार वाजता आल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दांडा मोर्चा आयोजित करणार असल्याचा इशारा दिला होता. प्रभाकर देशमुख यांनी जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केला असेल, तर इतर आंदोलने कशी होतात असा प्रश्न देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान सध्या हे सर्व आंदोलक इंदापूर पोलीसांच्या ताब्यात आहेत.
प्रभाकर देशमुख इंदापुर मध्ये दाखल होणार या पार्श्वभूमीवर इंदापूर तहसील प्रशासन या ठिकाणी आज सकाळपासून शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या दांडा आंदोलनाला प्रभाकर देखमुख शह देणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.अखेर प्रभाकर देखमुख सायंकाळी चार च्या दरम्यान इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल झाले,तो इंदापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.











