मुंबई महान्यूज लाईव्ह
दहावीत आता शिकलेले विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण होणार आहेत, मात्र यामध्ये वर्षातील लेखी मुल्यमापन करून त्यासाठी ३० गुण, दहावीच्या वर्षभऱाच्या अभ्यासक्रम काळातील गृहपाठ, तोंडी अथवा प्रात्यक्षिकांच्या घेतलेल्या परिक्षांतील मुल्यमापनासाठी २० गुण व नववीत त्या विद्यार्थ्याने विषयनिहाय मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुण असे भारांकन असणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती जाहीर केली. विद्यार्थ्या्ंचा निकाल १०० गुणांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकष जाहीर करताना सरल पोर्टलवरून माहिती घेतली जाणार आहे. मागील वर्षी नववीच्या मुलांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले होते. आताही दहावीची परिक्षा रद्द करताना शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी २४ बैठका घेण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.











