वकील संघटनेत हळहळ व्यक्त
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निष्णात वकील व कायदेपंडीत व इंदापूर च्या धर्मवीर संभाजीराजे सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष ॲड. संदिपान भगिरथ भोसले (वय ५३, रा.कळस ता.इंदापूर) यांचे काल सोमवारी निधन झाले.
शांत, संयमी, मितभाषी अशी ओळख निर्माण केलेल्या ॲड.भोसले यांच्या निधनाचे वृत्त इंदापूर मध्ये कळताच वकील संघटनेने हळहळ व्यक्त केली. ते पुणे येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
पुणे येथील सिंबायोसिस लॉ कॉलेज तेथे आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या ॲड.भोसले यांनी राजकारण व समाजकारण यामध्ये तत्त्वासाठी कधीही तडजोड केले नाही. इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कायदा आघाडी च्या संयोजक पदाची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. ॲड. संदिपान भोसले यांचे वडील भगीरथ भोसले यांचे गेल्याच आठवड्यात निधन झाले होते.











