झाडे, कुंड्यांची केली तोडफोड
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस केंद्रातील अंबिकानगर जिल्हा परीषध प्राथमिक शाळे समोरील झाडांच्या कुंडयाची तोडफोड केली असून काही मोठी झाडे व झाडांची फांद्या काही अज्ञात समाजकंटानी तोडून नासधुस करीत धुडगूस घातला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पाटस पोलीस चौकीत तक्रार दिली असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
पाटस-दौंड राज्य मार्गाववर असलेल्या पाटस येथील अंबिकानगर येथील जिल्हा परिषदची शाळा असून याठिकाणी अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेच्या समोर लोकसहभागातून विविध झाडे लावली आहेत. तसेच सौंदर्यासाठी विविध फुले व झाडांच्या कुंड्या आहेत.या झाडांना व कुंड्यामधील फुलझाडांना विद्यार्थी व शिक्षकांनी,शाळा व्यवस्थापन समितीच्या सभासदांनी पाणी देवून त्यांचे संगोपन केले आहे.
मात्र या परिसरातीलच काही समाजकंटाखानी रात्रीच्या सुमारास शाळेच्या सरंक्षक भिंतीवरून शाळेत प्रवेश करून शाळेच्या समोरील फुलझाडांच्या कुंड्याची तोडफोड करून इतरत्र फेकल्या आहेत. तर वाढ होत असलेल्या काही झाडे तोडली तर काही झाडांच्या फांद्या तोडून मोठे नुकसान केले आहे. शाळेच्या गेटचे काही लोखंडी गज कापून शाळेच्या आवारात येवून पत्ते खेळणे, मद्यपान करून बाटल्या टाकणे, गुटखा खावून रंगरोगोटी केलेल्या व चित्र काढलेल्या शाळेच्या भिंतीवर थुंकणे, दरवाजा समोर घाण करणे असे घृणास्पद प्रकार सातत्याने करीत आहेत.
या प्रकारामुळे शाळेचे शिक्षक वर्ग अक्षरक्षा वैतागला आहे. संबंधित समाजकंटक हे याच परिसरात शाळेच्या आसपास राहणारे आहेत. ज्या ठिकाणी त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. अशा विद्यामंदीरात विनापरवागी घेता प्रवेश करून शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करून धुडगुस घालण्याच्या प्रकारामुळे पालकवर्ग तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. संबंधित समाजकंटक् कोण आहेत याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी शाळाव्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पाटस पोलीस चौकीत तक्रार अर्जाद्वारे केली आहे.











