मुंबई – कोरोनाने राज्यातील पहिला बळी मुंबईतून घेतला असून कस्तुरबा गांधी रुग्णालयातील 64 वर्षीय रुग्णाचा आज (दि.17 मार्च) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील हा तिसरा बळी आहे. पाहता पाहता भारतात तीन बळी या रोगाने घेतले आहेत.
राज्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढलेली नाही हा दिलासा असला तरी लोण मात्र हळूहळू ग्रामीण भागाकडे सरकू लागल्याचे संकेत दिसत आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यात आढळले आहेत. या 39 रुग्णांपैकी दुबईतून आलेल्या 64 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झालेली आहे.











