• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

55 वर्षापूर्वी बारामतीच्या समाजकारणात रुजले शरद पवार हे नाव…!

Maha News Live by Maha News Live
December 12, 2020
in ताज्या बातम्या
0
55 वर्षापूर्वी बारामतीच्या समाजकारणात रुजले शरद पवार हे नाव…!

शरद पवार समजून घेताना -२

थोडे मागे वळून पाहिले तर तो काळ होता सन १८६५- ६६ च्या सुमाराचा…कोरड्या व ओसाड जमीनी, खडकाळ भूप्रदेश, अगदीच तुटपुंजा पाऊस, पाण्याच्या स्त्रोताची दुर्मिळता, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनंतरचा हा होता एक पर्जनछायेखालचा प्रदेश! पर्जन्यछायेखालचा प्रदेश मानला जात असला तरी सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून येणारे ढग भरून तर यायचे, पण फक्त यायचे आणि जायचे..पाण्याची आस मात्र लावून जायचे, बरसायचेच नाहीत. या स्थितीत मग माणसांची व जनावरांचीही आबाळ व्हायची. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाची व अगदी वाळवंटाच्या दाहकतेची आठवण करून देणारा हा प्रदेश होता, भिमथडी..!

सन १८७२ च्या काळातल्या या भिमथडी म्हणजेच आजच्या बारामती तालुक्याचे हे होते वास्तव.. आज बारामतीसह आजूबाजूचे तालुके समृध्दीच्या सहवासात आहेत आणि येथील शेतकऱ्यांच्या घराच्या ओट्यापर्यंत समृध्दीचा मृदगंध पसरला असला तरी ही सुफळ संपूर्ण विकासाची कहाणी तितकीच कष्टाची आहे आणि बुध्दीवंतांनी गाळलेल्या घामाचीही!

सन १८७६ ते ८७ च्या काळात प्रचंड दुष्काळी स्थिती होती आणि भारतावर होते ब्रिटीशांचे राज्य! भिमथडीतल्या लोकांमध्ये दुष्काळामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे प्रचंड असंतोष होता. हा असंतोष शमविण्यासाठी ब्रिटीशांनी निरा डाव्या कालव्याचे खोदकाम केले. काम पूर्ण झाल्यानंतर धरणही बांधले. साहजिकच या कालव्यामुळे अगदीच तीव्र अवर्षण प्रवण असलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला. त्या सर्व गावांतील शेती समृध्द झाली. २२ गावे बागायती बनली. त्य़ा गावांमध्ये अगदीच नगदी नसली तरी बऱ्यापैकी उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशी बागायती पिके घेतली जाऊ लागली. २२ गावांचा प्रश्न सुटला तरी बारामती तालुक्यातील उर्वरित गावांमधील जमीनी व एकूणच गावांचे अस्तित्व हे उंचवट्याच्या भागात असल्याने प्रवाही कालव्याचे पाणी काही या जमीनीपर्यंत पोचलेच नाही. साहजिकच तालुक्यातील दोन तृतीयाश शेती ही बेभरवशी बनली. वर्षाकाठी बरसणाऱ्या पावसाळ्यात अगदीच कमाल दहा ते बारा इंचाएवढा पाऊस आणि त्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने हा भाग दारिद्र्याच्या खाईत तसाच खितपत पडला होता. साहजिकच या काळात बारामती तालु्क्याचे समृध्दी व दारिद्र्य असे दोन परस्परविरोधी भाग पडले.

Next Post
अन फूड फॉर वर्कच्या संकल्पनेतून शरद पवार यांनी दिली राज्य व देशाला रोजगार हमीची योजना..!

अन फूड फॉर वर्कच्या संकल्पनेतून शरद पवार यांनी दिली राज्य व देशाला रोजगार हमीची योजना..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group