बारामती– बारामती तालुक्यातील समशेरबहादूर संताजी आटोळे यांच्या तैलचित्राचे अनावरण नागपूर येथील सिनीअर भोसला पॅलेस येथे करण्यात आले.
समशेरबहाद्दर संताजी आटोळे यांची विदर्भ ही कर्मभूमी होती. त्यांना विदर्भ आणि खानदेशासह बालाघाटपर्यंतची जहागीर छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती. गेल्या काही वर्षांपासून समशेरबहाद्दर संताजी आटोळे व इतर सरदारांच्या इतिहासाबद्दल येथील क्षत्रिय सगर रजपूत (सगर मराठा) सेवा संघ ही संघटना प्रयत्नशील आहे. ही संघटना यासंदर्भात संशोधनही करीत होती. त्याचाच एक भाग म्हणून आज नागपूर येथे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते सरदार आटोळे यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. यावेळी संघटनेचे रणजीत ताम्हाणे, मिलिंद वायाळ, गणेश नाळे, बबलू गाढवे व संतोष सोरटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.










