बारामती : महान्यूज लाईव्ह
यावर्षीच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त अडचण झाले आहे ती मराठा समाजाची कारण मराठा आरक्षण स्थगिती दिल्यानंतर आता एस इ बी सी मधून मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मध्ये आरक्षण नाही आणि केवळ मराठा म्हणून सध्या अधिकारी देखील ही ईडब्ल्यूएस दाखला देत नाहीत,त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे येत्या बारा नोव्हेंबर पर्यंत फक्त वैद्यकीय प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नाव नोंदणी होणार आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जर ईडब्ल्यूएस दाखले मिळाले नाहीत तर मराठा समाजाला आरक्षणाची संधी नाही.
या संदर्भात बारामतीतील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असून यामध्ये यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस दाखला उपलब्ध करून द्यावा व ईडब्ल्यूएस मधून प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार आहे. त्या करता नाव नोंदणी पर्यंत साठी 12 नोव्हेंबर ची मुदत आहे. आताच्या परिस्थितीमध्ये ज्यांना ईडब्ल्यूएस दाखले मिळालेले नाहीत, त्यांना आता ईडब्ल्यूएस दाखले मिळण्याची शक्यता देखील नाही. त्यामुळे एसीबीसी दाखले मिळालेल्या मराठा विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे नाव नोंदणी करण्याची संधी द्यावी अशी मागणी हेमचंद्र शिंदे यांनी केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे राज्य सरकारने दिलेला सेंट्रल करिता ईडब्ल्यूएस दाखला आहे तो दाखला राज्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गृहीत धरावा अशी मागणीदेखील शिंदे यांनी केली आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे व शासन आदेश नसल्यामुळे तहसील कार्यालया मधून मराठा आरक्षणाचे दाखले मिळत नाहीत परिणामी विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हा मराठा विद्यार्थ्यांचा दोष आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला असून नाव नोंदणी मध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे आता एसईबीसी पर्याय नोंदवण्याची सोय या नाव नोंदणी मध्ये नाही.
मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून पात्रता असून त्यांना ईडब्ल्यूएस मधून नाव नोंदणी करता यावी अशी संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ज्या एसईबीसी मराठा विद्यार्थ्यांकडे देशपातळीवरील प्रवेशासाठी राज्याच्या यंत्रणेद्वारा देण्यात आलेला सेंट्रल गव्हर्मेंट ईडब्ल्यूएस दाखला आहे, तो दाखला नाव नोंदणी मध्ये घाय धरण्यात यावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
ज्या मराठा विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करताना यापूर्वीच खुल्या गटातून केलेली आहे, त्यांना संबंधित यंत्रणेद्वारा अनलॉकिंग करून प्रवर्ग बदलण्याची संधी १२ नोव्हेंबरपूर्वी करून द्यावी आणि ज्यांच्याकडे राज्य शासनाने दिलेला सेंटर दाखला आहे, तो दाखला राज्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात यावा अशी मागणी करून केवळ तांत्रिकदृष्ट्या उद्भवलेल्या समस्येमुळे मराठा समाजाचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.










