बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील बऱ्हाणपुर येथे गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी एका कार्यकर्त्याने अगोदर उपोषणाचा इशारा दिला, मात्र प्रशासन जागे होत नाही हे पाहून, तो बीएसएनएल कंपनीच्या मोबाईलवर टॉवरवर चढला व त्याने आंदोलन सुरू केले. आज सकाळी आठ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू केले.
याचा व्हिडीओ येथे पाहू शकता अथवा महान्युज लाईव्ह फेसबुक वर पाहू शकता
बर्हाणपूर येथील अनिल गवळी यांनी हे आंदोलन सुरू केले असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बीएसएनएल कंपनीचा मोबाइल टॉवर व त्याने चढण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी आठ वाजताच ते बीएसएनएल टॉवर वर चढले. बऱ्हाणपुर गावात सार्वजनिक रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केले व प्रशासन ते काढत नाही या कारणावरून त्यांनी हा मार्ग अवलंबला. सातत्याने सरकारी यंत्रणेशी पत्रव्यवहार करुन मागणी करून व पाठपुरावा करूनही काही फरक पडत नसल्याने या व्यक्तीने हा मार्ग अवलंबिला. गावातील अतिक्रमण, भ्रष्ट प्रकरणे, घरकुल योजनेतील फसवणूक अशा अनेक योजनांचा त्यांनी पाढा वाचला असून सरकार काहीच करत नसल्याचा भावनेने नैराश्यातून त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे.











