बारामती : महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 20 जण कोरणा बाधित आढळून आले आहेत तर बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये मिळून 143 जणांची तपासणी झाली यामध्ये पंधरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वालचंदनगर येथील पाच वर्षीय मुलगा, 53 वर्षीय पुरुष, पाच वर्षीय मुलगा, कळंब येथील तीस वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 68 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, 60 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, डाळज नंबर 1 येथील 40 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील 35 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, कचरवाडी येथील 17 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवती, पळसदेव येथील 18 वर्षीय युवक, पोंदकुलवाडी येथील 21 वर्षीय युवक, भावडी येथील 52 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, न्हावी येथील 40 वर्षीय महिला, पिंपरी येथील तीस वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
बारामती तालुक्यात काल फक्त पंधरा रुग्ण
काल बारामती तालुक्यात 139 जणांची तपासणी झाली या तपासणीमध्ये 15 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल उपचारादरम्यान आणखी एका कोरोनाग्रस्त चा मृत्यू झाला असून कोरोनाबळींची संख्या 118 वर पोहोचली आहे, तर बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता हळूहळू साडेचार हजार कडे वाटचाल करीत आहे.










