बारामती पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांचे निवेदन
बारामती : महान्यूज लाईव्ह
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणारी एक टोळी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अभाविप बारामती शाखेच्या वतीने पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देऊन अशा देशविघातक कृत्याची कसून चौकशी करावी अशी मागणी केली.
अभाविप बारामती जिल्हा संयोजक समीर मारकड, बाळासाहेब सोलनकर, सुजीत सोरटे, विक्रम शिंदे, स्वप्निल देवकाते, गोरखनाथ केंद्रे , ओंकार गहिन यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी करण्यात आली.
ही टोळी मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरामध्ये बांगलादेशीना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरता बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचे काम करत होती, त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा व या देशद्रोगी कृत्याची कसून चौकशी करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.











