महान्यूज आजची गझल
माय पडू दे पाय म्हणालो
मी मातीला माय म्हणालो
त्याला केवळ पैसा पचतो
चुकून भाकर खाय म्हणालो
भाषण नाही रोजगार दे
सांग चुकीचे काय म्हणालो
सोपे नसते विकणे सुद्धा
देश असो वा,चाय म्हणालो
नुकसानीची मोजत किंमत
भरपाईला न्याय म्हणालो
गझलकार- शरद धनगर











