इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल वालचंदनगर आणि निमगाव केतकी या दोन गावांमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला, यामध्ये निमगाव केतकी येथे तीन जण कोरोना बाधित आढळून आले, तर वालचंदनगर येथे पाच जण कोरोना बाधित आढळून आले. तालुक्यात काल 28 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
काल आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये भाटनिमगाव येथील 65 वर्षीय महिला 80 वर्षीय महिला कळंब येथील 53 वर्षीय पुरुष 25 वर्षीय पुरुष वालचंदनगर येथील 34 वर्षीय पुरुष 28 वर्षीय पुरुष तीस वर्षीय महिला 37 वर्षीय पुरुष 32 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत
रेडा येथील एकूण 70 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, निरवांगी येथील 45 वर्षे पुरुष, निमगाव केतकी येथील दहा वर्षीय मुलगी, 65 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगी, न्हावी येथील 36 वर्षीय पुरुष, वरकुटे खुर्द येथील 38 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
भिगवण येथील 65 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बंडगरवाडी येथील 45 वर्षीय महिला, पोंधवडी येथील 45 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 3 येथील 40 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, डिक्सळ येथील 85 वर्षीय पुरुष, शेटफळगडे येथील 70 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.










