इंदापूर : महान्युज लाईव्ह
गेल्या सहा ते सात दिवसापासून कोरोनाचे सावट बारामती आणि इंदापूर मध्ये जैसे थे कायम आहे. जेवढ्या तपासण्या अधिक, तेवढे कोरोनाचे रुग्ण अधिक, जेवढ्या तपासण्या कमी, तेवढे रुग्ण कमी, अशा स्वरूपाचा लपंडाव सध्या सुरू आहे.
काल इंदापूर तालुक्यात 44 रुग्ण आढळले, महत्त्वाची बाब अशी की, फक्त 81 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये 44 जण आढळले आहेत. त्यामुळे तपासण्यांच्या तुलनेत तब्बल 50 टक्क्यांवर कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे, तर बारामती तालुक्यात काल 145 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये 24 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बारामतीतील ही संख्या कायम असल्याचे दिसते.
काल बारामतीतील पवार लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये पणदरे येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
काल इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश असून यामध्ये आरोग्य कर्मचारी दांपत्यासह त्याच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. हे पती-पत्नी कर्मचारी बारामती तालुक्यात कार्यरत असून कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. हे कर्मचारी सणसर येथील रहिवासी असले, तरी बारामती तालुक्यात आरोग्य खात्यामध्ये कार्यरत आहे.
काल इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपरी बुद्रुक येथील 45 वर्षीय महिला, कुरवली येथील तीस वर्षीय पुरुष, जंक्शन येथील 57 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, भिगवण येथील 48 वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील 52 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय युवती, 50 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, तीस वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील 25 वर्षीय पुरुष पिंपरी खुर्द येथील एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये 76 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, 16 वर्षीय युवक, 29 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
शेळगाव येथील 32 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, रेडणी येथील 40 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, झगडेवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, पांढरेवस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपरी खुर्द येथील 65 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कळंब येथील 45 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 45 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रेट तपासणीत फलटण रोड कसबा येथील 47 वर्षे पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे
बारामती तपासलेल्या आर्टिपीसीआर तपासणीत माऊलीनगर येथील 22 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 75 वर्षीय महिला, उंडवडी येथील 38 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 28 वर्षे पुरुष, खंडोबानगर येथील 33 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील 40 वर्षीय पुरुष संग्रामनगर येथील 36 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 24 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, कसबा येथील 24 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील पाच वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये











