सुपे : महान्यूज लाईव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामस्थ व युवकांच्या वतीने मयूरेश्वराला साकडे घालत अजितदादा कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली.
सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे आणि त्यांचे पती अनिल हिरवे यांनी अभिषेक घालून मयूरेश्वराला साकडे घातले. मोरगावच्या मयूरेश्वर मंदिराशेजारील प्रतिस्थापना मूर्तीस अभिषेक, पूजा करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यावेळी सरपंच स्वाती हिरवे, अनिल हिरवे, अशोक लोणकर, महेश चांदगुडे, अतुल खैरे, शंकर संकट, सुयश जगताप, जावेद सय्यद, मल्हारी खैरे, मुनीर डफेदार, गणेश जाधव, रेखा चांदगुडे, राजश्री धुमाळ, सुमन जगताप यांच्यासह सुपे, मोरगाव परिसरातील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा हे राज्याच्या हितासाठी झटत आहेत. कोरोना काळातही त्यांनी जनतेच्या हिताची जपणूक केली आहे. राज्यातल्या लाखो जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम दादांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ते लवकरात लवकर बरे होवून पुन्हा एकदा जोमाने काम करतील असा विश्वास स्वाती हिरवे यांनी यावेळी व्यक्त केला.











