अजितदादांच्या प्रकृतीसाठी मयूरेश्वराला साकडं..!
सुपे : महान्यूज लाईव्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामस्थ व युवकांच्या वतीने मयूरेश्वराला साकडे घालत अजितदादा कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली. सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे आणि त्यांचे पती अनिल हिरवे यांनी अभिषेक घालून मयूरेश्वराला साकडे घातले. मोरगावच्या मयूरेश्वर मंदिराशेजारील प्रतिस्थापना मूर्तीस अभिषेक, पूजा करण्यात आली. ...











