त्यांच्या श्रमदानाचं प्रतिबिंब उमटलं पाणवठ्यात..! विद्या प्रतिष्ठानच्या सुपे शाळेचा अनोखा उपक्रम
सुपे : महान्यूज लाईव्ह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेत बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी एकत्र येत येथील अभयारण्यातील वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पाणवठ्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. तसेच येथे असंलेल्या झाडांनाही ...











