इंदापूर : महान्यूज लाईव्ह
एच.के.जी.एन ग्रुप व इंदापूर शहर बागवान जमात यांच्या संयुक्त विद्यमाने पैगंबर जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. 30) इंदापुरात रक्तदान शिबिर व कोरोना योद्ध्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे.
अशी माहिती एच.के.जी.एन ग्रुपचे अध्यक्ष रियाज बागवान व उपाध्यक्ष तोसिफ बागवान यांनी दिली. शुक्रवारी शहरातील दर्गाह मस्जिद चौक येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिताताई शहा असतील.
पैगंबर जयंतीसाठीचा जुलूस शहरातून न काढता जयंतीच्या होणाऱ्या खर्चास फाटा देऊन हा सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे. यावर्षी रक्तदान करून रक्तदानात विक्रम करण्याचा संकल्पही करण्यात आल्याची माहिती रियाज बागवान यांनी दिली.











