इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये कोरोनाची काळजी कमी होऊन रस्त्यावरील गर्दी आणि बेपर्वाई वाढली आहे, त्याचा परिणाम म्हणून काल इंदापूर तालुक्यात तब्बल 35 जण कोरोना बाधित आढळले आहेत. एवढेच नाही तर काल 122 जणांची कोरोना तपासणी करावी लागली आहे. त्यामुळे कोरोना संपलेला नाही, जेवढी गर्दी कराल, तेवढा कोरोना वाढणार आहे याची नोंद घेण्याची गरज आहे.
काल इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 57 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 68 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
मानकरवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, बेलवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील 38 वर्षीय उद्योजक, इंदापूर येथील 49 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष न्हावी येथील 38 वर्षीय पुरुष, वरकुटे खुर्द येथील 34 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी, सुरवड येथील 24 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
रेडणी येथील 69 वर्षीय महिला, इंदापूर येथील 53 वर्षीय पुरुष, शहा येथील 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय महिला, न्हावी येथील 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, भिगवण येथील 47 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगा, 18 वर्षीय युवती, 14 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.











Visit daily Job Bulletin for free job alerts
http://www.dailyjobbulletin.in