मुंबई : महान्यूज लाईव्ह
“तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सिन देंगे” असा नारा भाजप देत आहे, तर भाजप फक्त वोट देणाऱ्यांनाचं मोफत लस देणार आहेत का.. ? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्या जाहीरनाम्याप्रमाने आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची ‘लस’ मोफत देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. याच विषयी राऊतांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
कोरोनाची लस केवळ भाजपसरकार असलेल्या राज्यांतील जनतेलाचं मोफत मिळणार का??,असा प्रश्नही संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. यावर भाजप काय उत्तर देणार हे महत्वाच आहे.











