इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यात ६४ जणांच्या रॅपीड अॅंटिजेन व आरटीपीसीआर तपासण्या झाल्या, त्यामध्ये २१जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकंदरीत कोरोनाचा प्रभाव कमी दिसत असला तरी तपासण्यांच्या तुलनेत अजूनही कोरोनाचा प्रभाव २० टक्क्यांपर्यंत दिसतो आहे.
काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वडापुरी येथील २८ वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील ७० वर्षीय पुरूष, २३ वर्षीय पुरूष, भादलवाडी बिल्ट कंपनीतील ४७ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय महिला, १९ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सणसर येथील ३४ वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष शेटफळगडे येथील 65 वर्षे पुरुष तावशी येथील २१ वर्षीय पुरूष, म्हसोबावाडी येथील ३० वर्षीय पुरूष, तक्रारवाडी येथील २८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, वरकुटे खुर्द येथील ३५ वर्षीय महिला, भोडणी येथील २१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कौठळी येथील ५१ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील २४ वर्षीय पुरूष, दगडवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, बेलवाडी येथील १८ वर्षीय महिला, परिटवाडी .येथील ५० वर्षीय पुरूष, लाकडी येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.










