इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात ६८ जणांची दिवसभरात तपासणी झाली. त्यामध्ये रॅपीड अॅंटिजेन तपासणीत ४० नमुन्यांमध्ये १२ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर २८ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये निमगाव केतकी येथील ६५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, इंदापूर शहरातील ५० वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष, ४६ वर्षीय महिला, बावडा येथील ६५ वर्षीय पुरूष, कालठण नंबर १ मधील ७१ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जंक्शन येथील ३० वर्षीय पुरूष, कुरवली येथील ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या खासगी आरटीपीसीआर तपासणीत सपकळवाडी येथील ४० वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आला आहे.











