• Contact us
  • About us
Tuesday, October 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उजनी मच्छिमार बचाव अभियानाच्या आंदोलनाचं यश!  अखेर उजनी जलशायतील संभाव्य मासेमारी ठेकेदारी पद्घत रद्द!

mahaanewslive by mahaanewslive
October 5, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महाराष्ट्र, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उजनी मच्छिमार बचाव अभियानाच्या आंदोलनाचं यश!  अखेर उजनी जलशायतील संभाव्य मासेमारी ठेकेदारी पद्घत रद्द!

इंदापुर : महान्यूज लाईव्ह
उजनी मच्छिमार बचाव अभियानाच्या आंदोलनाची दखल घेत अखेर उजनी जलशायतील ईओआय अर्थात संभाव्य मासेमारी ठेकेदारी पद्घत रद्द करण्यात आल्याची घोषणा आज मंत्रालय मुंबईत जलसपदा (गोदावरी व कष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व्हीसी वर उपस्थित होते.या निर्णयामुळे उजनीतील मच्छिमारांवरील ठेकेदारीचे संकट टळले तर दुसऱ्या बाजुने ठेका घेणाऱ्या भांडवलदार कंपन्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाने उजनीतील मासेमारी व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रणालीचा अवलंब केला होता.त्यामुळे मच्छिमार व त्यासंबंधीचे व्यावसायिक अडचणीत आले होते.यावरून या प्रक्रिये विरोधात सातत्याने जन आंदोलने उभारण्यात येत होती. अखेर आजच्या या बैठकीत ही ईओआय प्रणाली रद्द करण्यात आल्याने मच्छिमारांनी एकाच जल्लोष केला.

संभाव्य ठेकेदारी पद्घत बंद करण्यासाठी भोई मच्छिमार ,लोकशासन आंदोलन व इतर मच्छिमार संघटनांच्या वतीने गेली दोन अडीच महिन्यांपासून आंदोलने सुरू होती. गावोगावच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व पुण्यातील प्राणांतिक उपोषण आणि कृष्णा खोरे विकास महा मंडळाच्या एमडी यांच्या समोर संतप्त आंदोलकांनी बांगडया फोडल्यानंतर ठेका रद्द ची प्रक्रियेने वेग घेतला होता.

आज दि.५ रोजी मंत्रालयात राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे यांनी मच्छिमार प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती यामध्ये काही क्षणातच विखे पाटील यांनी ईओआय प्रणाली रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही ठेका रद्दला पाठींबा दिला. उजनी जलाशयातील मासेमारी बाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाने स्वारस्य अभिव्यक्ती ही प्रणालीचा अवलंब केला होता.त्यामुळे हा व्यवसाय भांडवलदारांच्या हातात जाणार आणि पूर्वीप्रमाणे अन्यायाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.

उजनीतील या व्यवसायावर पारंपरिक मच्छिमार तसेच भूमिहीन, पारधी,मागासवर्गीय, मुस्लिम कुटुंबाचा उदरनिर्वाह व रोजगार अवलंबून आहे मात्र हा रोजगार हिरावणारा व मच्छिमार तसेच व्यापारी,आडतदार,हॉटेल व्यावसायिक,जाळी दुकानदार,बर्फ कारखानदार, तोडाई, कामगार यांना देखील अडचणी येणार होत्या. यावरून मच्छिमार बचाव अभियानाच्या वतीने उजनी काठच्या प्रत्येक गावात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व पुण्यातील प्राणांतिक उपोषण आणि जलसंपदा विभागाच्या एमडी यांच्या टेबलावर फोडलेल्या बांगड्या मुळे आंदोलन लक्षवेधी ठरले होते.

भिगवण व इंदापुर मासळी बाजार बंद ठेवले होते. अखेर या लढ्याला यश आल्याने उजनीतील मच्छिमारांनी आनंद व्यक्त केला आहे. मच्छिमार बचाव अभियानाच्या वतीने चंद्रकांत भोई, दत्तात्रय व्यवहारे,उज्वला परदेशी,बाळासाहेब काळे,संजय दरदरे ,बाळासाहेब गाडेकर, अनिल नगरे, बापुराव भोई, विक्रम शेलार, अनिता नगरे, युवराज नगरे,बलभीम भोई, अमोल पतुरे, पोपट नगरे, भारत भोई,लतीफ काळे, अमजद शेख आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलने सुरू होती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group