पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमानवार यांच्या राजीनामासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज दुपारी चार वाजता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे भेट देणार आहेत, तर उद्या बुधवारी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
पुण्यात सुरू असलेल्या या आंदोलनात रविवारी राज्यातील दिग्गज नेत्यांनी सहभागी होत राज्य सरकारला इशारा दिला. यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार आदींचा समावेश होता. आमदार रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून या सत्याग्रहात सहभागी आहेत.
आज सकाळी आंदोलकांनी आमच्या स्वप्नांची राज्य सरकारने राख रांगोळी केली असे म्हणत स्वप्नांची तिरडी आंदोलन स्थळी आणली. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा देत विद्यार्थ्यांच्या सहनशील तिचा अंत पाहू नका असे सुनावले.










