• Contact us
  • About us
Saturday, October 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची राष्ट्रीय कार्यकारी परिषद! बारामतीत ३५ प्रांतातील प्रतिनिधी उपस्थित!

mahaanewslive by mahaanewslive
October 3, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, Featured
0
अखिल भारतीय ग्राहक पंचायतची राष्ट्रीय कार्यकारी परिषद! बारामतीत ३५ प्रांतातील प्रतिनिधी उपस्थित!

देशभरातील ३८ प्रांतांतील ३५० प्रतिनिधींचा सहभाग; डिजिटल युगातील ग्राहक आव्हाने आणि संघटनात्मक बांधणीवर सखोल विचारमंथन

बारामती : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे आयोजन ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर येथील मंथन सभागृहात करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील ३८ प्रांतांमधून सुमारे ३५० राष्ट्रीय व प्रांतीय पदाधिकारी, कार्यकर्ते, कायदेतज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल व्यवहार, ई-कॉमर्स तसेच ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यांसारख्या समकालीन विषयांवर या परिषदेत सखोल विचारमंथन करण्यात आले.

परिषदेच्या मुख्य सत्राचा शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शहा, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा आशा सिंह, राष्ट्रीय सचिव जयंतीभाई कथेरिया आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रारंभी स्वामी विवेकानंद, भारतमाता आणि ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण देशपांडे, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, केंद्रीय प्रचार-प्रसार सह आयाम प्रमुख विजय सागर, राष्ट्रीय महिला जागरण प्रमुख वीणा दीक्षित, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड आणि क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांच्यासह देशभरातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत तुषार झेंडेपाटील यांनी केले, प्रास्ताविक बाळासाहेब औटी यांनी मांडले, तर सूत्रसंचालन जयंतीभाई कथेरिया यांनी केले.

​उद्घाटनप्रसंगी बोलताना राजेंद्र पवार यांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावावर सविस्तर भाष्य केले. आगामी दहा ते पंधरा वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रणांमुळे शेती, उद्योग, वाहतूक आणि ग्राहक क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याचे सांगत ग्राहक चळवळीने या आव्हानांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आप्पासाहेब पवार यांच्या काळापासून सुरू असलेल्या ट्रस्टच्या कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला.

​राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांनी ग्राहक पंचायतीची मूळ भूमिका स्पष्ट केली. केवळ वैयक्तिक समस्या सोडवणे हा ग्राहक चळवळीचा मर्यादित उद्देश नसून, ग्राहकांचे संघटन, जागरण आणि प्रबोधन करून शोषणमुक्त समाज घडवणे हे मुख्य कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधन, संघटन, रचनात्मक कार्य आणि संघर्ष या चतुःसूत्रीच्या माध्यमातून ग्राहक चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी मांडला. तसेच राष्ट्रीय सचिव जयंतीभाई कथेरिया यांनी डिजिटल युगातील ग्राहक समस्या सोडवण्यासाठी गावागावांत सुशिक्षित तरुणांची फळी तयार करण्याचे आवाहन केले.

​परिषदेदरम्यान आयोजित अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा आणि कायदेशीर संरक्षणावर मार्गदर्शन केले. त्यासोबतच भारतीय मानक ब्युरो (BIS), बीआयएस केअर ॲप, अन्नसुरक्षा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वस्तूंचे छापील मूल्य (MRP), ऑनलाइन फसवणूक आणि यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्क यांसारख्या आर्थिक आणि कायदेशीर विषयांवर तज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमावर झालेल्या हल्ल्याचा परिषदेत तीव्र निषेध नोंदवून कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत ठराव करण्यात आला.

या ऐतिहासिक परिषदेचे औचित्य साधून ग्राहक पंचायतीच्या ५२ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या ‘ग्राहक गाथा’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. अखेरच्या दिवशी उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या व्यवस्थापन समित्या, स्वयंसेवक आणि तालुका कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

मध्य महाराष्ट्र प्रांत आणि पुणे जिल्हा शाखेच्या पुढाकाराने आयोजित ही परिषद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तुषार झेंडे-पाटील, उपाध्यक्ष दिलावर तांबोळी, कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, संपत फराटे, तुकाराम फराटे यांच्यासह बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड परिसरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भविष्यातील तंत्रज्ञानाधारित ग्राहक चळवळीची नवी दिशा निश्चित करत या परिषदेची सांगता झाली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group