पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत ३ नोव्हेंबर रोजी बारामतीत येत आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना आमंत्रण दिले होते. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा सुरू होती. आज यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रेरणास्थळावरील तथागत गौतम बुद्धांच्या ४ टन वजनाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ते बारामती विमानतळावर पोहोचणार आहेत. याच प्रेरणास्थळात देशातील व राज्यातील महापुरुषांच्या प्रतिमा उभारण्यात आलेल्या आहेत.
मोदी हे दहा वाजता बारामती विमानतळावर पोहोचणार असून प्रेरणास्थळाचे उद्घाटन व त्यानंतर गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते यावेळी एआय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर ते मुख्य कार्यक्रमात सहभागी होतील.
यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रमुख, गेटस फाऊंडेशन, सायरस पुनवाला, बाबा कल्याणी, पंचशील फाऊंडेशन अतुल चोरडीया, निलकंठ छाब्रिया, एमकेसीएलचे विवेक सावंत, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, प्रताप पवार आदी उपस्थित राहणार आहेत.










