• Contact us
  • About us
Friday, September 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

८८.५९ लाखांचा चेक बाऊन्स; आरोपीला तीन महिने कारावास, ९७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश!

mahaanewslive by mahaanewslive
September 23, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत दोन महिन्यात ५ ते ६ आत्महत्यांच्या घटना; तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंता!

बारामती : महान्यूज लाईव्ह

थकीत व्यावसायिक रकमेपोटी दिलेला ८८ लाख ५९ हजार ९०३ रुपयांचा चेक न वटल्याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यात पुण्यातील येथील वरिष्ठ स्तर व प्रमुख न्यायदंडाधिकारी आनंद एस. मुंढे यांनी आरोपीला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, फिर्यादीस ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. हा निकाल २१ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आला.

स्पंदन मेडिकेअरचा संचालक जगदीश बाजीराव कदम (रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. युनायटेड मेडिकल सोल्यूशन कंपनीतर्फे जयदीप दत्ताराम कुंभार (रा. वारजे, पुणे) यांनी ही खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. फिर्यादीची वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी पुरविणारी फर्म असून, आरोपीने वेळोवेळी या फर्मकडून मशिनरी खरेदी केली होती. या व्यवहारातील थकीत रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने ८८ लाख ५९ हजार ९०३ रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बँकेत जमा केल्यानंतर सदर धनादेश न वटता परत आला.

धनादेश अनादरानंतर फिर्यादीने अॅड. विशाल विजयकुमार बर्गे आणि अॅड. युवराज जाधव (रा. बारामती) यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. सुनावणीदरम्यान आरोपीने संबंधित रक्कम यापूर्वीच परत केल्याचा, तसेच पैसे उकळण्याच्या उद्देशाने खोटा खटला दाखल करण्यात आल्याचा बचाव घेतला.

त्यावर फिर्यादीतर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी युक्तिवाद करताना चेकचा गैरवापर होण्याची भीती असल्यास आरोपीने पोलिसांत तक्रार करणे किंवा बँकेला ‘स्टॉप पेमेंट’च्या सूचना देणे अपेक्षित होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन आपली बाजू मांडण्यात आली नसल्याचा आणि आरोपीने चेकवरील स्वाक्षरी नाकारली नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

फिर्यादीतर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले. अॅड. विशाल बर्गे आणि अॅड. युवराज जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय, फिर्यादीस ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group