• Contact us
  • About us
Monday, September 21, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडच्या भीमनगरमध्ये रात्रीच्या अंधारात माती उपसा; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

mahaanewslive by mahaanewslive
September 20, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंडच्या भीमनगरमध्ये रात्रीच्या अंधारात माती उपसा; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड शहरातील भीमनगर परिसरात भीमा नदीकाठालगत असलेल्या खासगी शेतजमिनीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे मातीचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतजमिनीचे नुकसान होत असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

दौंड शहर हद्दीतील भीमनगर येथील  शेतजमिनीतून रात्रीच्या वेळी मातीचा उपसा केला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जेसीबीच्या सहाय्याने जमीन खोदून माती काढल्यानंतर ती हायवा वाहनांमधून अन्यत्र नेली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतजमिनीचा पोत आणि भविष्यातील शेतीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी सुधीर भीमा सोनवणे आणि अजय अर्जुन सोनवणे यांनी दौंड तहसीलदार तसेच दौंड पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारी करूनही संबंधितांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच स्थानिक महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला असून, या आरोपांची प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी मातीने भरलेली हायवा वाहने दौंड शहरातून वाहतूक करत असताना हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास का आला नाही, असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. माती उपशासाठी आवश्यक परवानग्या, महसूल नियमांचे पालन आणि वाहतुकीबाबतच्या नियमांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन माती उपशाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी, पंचनामा करावा आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुधीर सोनवणे आणि अजय सोनवणे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, “याबाबत तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group