बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती व इंदापूरातील कोरोनाचा आलेख अगदीच कमी झाला असून उच्चांकाकडून पुन्हा सुरवातीच्या वेळी जसे रुग्ण आढळत होते, त्या स्थितीकडे हा कल झुकला आहे. ही अत्यंत दिलाशाची बाब आहे, मात्र मुंबईचा अनुभव आपल्या पाठीशी आहे, तिथे कोरोना एकदम कमी झाला होता, मात्र नागरिक पुन्हा वेगाने बाहेर पडले आणि कोरोनाची दुसरी लाट तेवढ्याच वेगाने पसरली, तेव्हा अजून काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे.
धक्कादायक, कहर अशा बातम्यांनी अस्वस्थ असलेल्या नागरिकांसाठी ही चांगली दिलाशाची बातमी आहे, मात्र ही स्थिती कायम राखण्यासाठी काळजी घेण्याचीही गरज आहे. थंडी सुरू झाल्याने दुसरी लाट येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
काल बारामतीत झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत शिर्सूफळ येथील ४५ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३१ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष माऊलीनगर येथील ७२ वर्षीय पुरूष, कटफळ येथील ४२ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४० वलर्षीय पुरूष, तांबेनगर येथील ४८ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील सोहम पार्क येथील ३९ वर्षीय महिला, काटेवाडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीमध्ये झाालेल्या आरटीपीसीआर तपासणीत माळेगाव येथील ३१ वर्षीय महिला, करंजे गावठाण येथील ६२ वर्षीय पुूरूष, पवार हॉस्पिटल येथील ४३ वर्षीय महिला, जळोची, शिवाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल १३ जण कोरोनाबाधित
इंदापूरमध्ये देखील काल तपासणी झालेल्या नमुन्यांमध्ये केवळ १३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ही संख्या दररोज कमी होत चालली आहे, हा इंदापूर तालुक्यासाठी मोठा दिलासा आहे.
काल झालेल्या तपासणीत आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जंक्शन येथील ४६ वर्षीय पुरूष, ४६ वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरूष, गलांडवाडी येथील ५ वर्षीय पुरूष, वडापुरी येथील ३७ वर्षीय पुरूष, घोलपवाडी यथील २५ वर्षीय पुरूष, भोडणी येथील ६५ वर्षीय पुरूष, घागरगाव येथील १८ वर्षीय युवती, कळंब येथील ५ वर्षीय मुलगा, निमगाव केतकी येथील ३८ वर्षीय पुरूष, भिगवण येथील ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.











