• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नीरा डावा कालव्याच्या पाणीवाटपावरून इंदापूरच्या पश्चिम भागातील शेतकरी आक्रमक! ३ सप्टेंबरला पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे लेखी आश्वासन!

mahaanewslive by mahaanewslive
August 29, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
नीरा डावा कालव्याच्या पाणीवाटपावरून इंदापूरच्या पश्चिम भागातील शेतकरी आक्रमक! ३ सप्टेंबरला पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे लेखी आश्वासन!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नीरा डावा कालव्याची रखडलेली पाणीपाळी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी पाणीवाटपात पश्चिम भागावर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, पाटबंधारे विभागाने ३ सप्टेंबर रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.

पश्चिम भागातील नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील मका, कडवळ, भुसार, चारा तसेच ऊस पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, कालव्याची पाणीपाळी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे संघटनेने सांगितले. त्यातच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील ओलावा घटला असून हुमणीच्या प्रादुर्भावामुळे पिकांवर अतिरिक्त संकट निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.

पाणीवाटपातील असमानतेचा आरोप..
इंदापूर तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीवाटपाच्या स्थितीवरूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रश्न उपस्थित केला. पूर्व भागात तुलनेने मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने तेथील बागायती क्षेत्र वाढत आहे, तर पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वारंवार आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला.

पूर्व भागातील काही शेतांमध्ये पाणी साचून शेवाळ निर्माण होत असल्याचे चित्र असताना पश्चिम भागातील पिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. पाणीवाटपात अशी तफावत का निर्माण होते, याबाबत पाटबंधारे विभागाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पाणीवाटपावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चर्चा..
पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर झालेल्या चर्चेत ३ सप्टेंबर रोजी नीरा डावा कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र, ३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही, तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, इंदापूर तालुक्याचे माजी सभापती करणसिंह घोलप, उद्धटचे सरपंच रवी यादव, पवारवाडीचे सरपंच बबन वाबळे, सरपंच सतीश थोरात, आप्पा चव्हाण, तालुकाध्यक्ष आबासाहेब झगडे, अनिल काळभोर, दादा थोरात, रंजीत गाडगे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group