शिरूर : महान्यूज लाईव्ह
परप्रांतीय तरुणीला चांगल्या पगाराचे व नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दीपक श्रीमंदिलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर शहरातील एका लॉजवरील खोलीमध्ये वरील आरोपींनी परप्रांतीय तरुणीला चांगल्या पगाराच्या व कामाचे आमिष दाखवून आणले. त्यानंतर पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे तसेच एका आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ,दमदाटी केली.
दरम्यान पीडितेने पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. शिरूर शहरात घडलेल्या या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.










